कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या दृष्टीने आजचा (शुक्रवार) दिवस चांगला ठरला. घरफाळा विभागाकडे आज दिवसभरात तब्बल ९९ लाख २२ हजार २६४ रुपयांची वसुली जमा झाली. ही रक्कम मिळकतधारकांनी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रासह ऑनलाईनद्वारे जमा केली. 

महापालिकेच्या घरफाळा वसुली मोहीम राबवली जात आहे. तर शहरातील मिळकतधारकांना कराच्या थकीत रक्कमेवर येणाऱ्या दंडाच्या आकारणीमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत ७० टक्के सवलत योजना जाहीर  केलीय. या योजनेचा लाभ घेत शहरातील मिळकतधारकांनी आज दिवसभरामध्ये चार नागरी सुविधा केंद्र आणि महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रासह ऑनलाईनद्वारे ९९ लाख २२ हजार २६४ रुपये घरफाळा जमा केला. घरफाळा वसुलीचे मार्च अखेरपर्यंतचे उद्दिष्ट ७९ कोटी रु. आहे. त्यापैकी आजअखेर ४९ कोटी ४० लाख इतकी वसुली झाली आहे.

पाणीपट्टी वसुलीचे एकूण उद्दिष्ट ६९ कोटी ५० लाख आहे. यातील ५६ कोटी ७५ लाख प्रत्यक्ष पाणीपट्टीपैकी आजअखेर २८ कोटी ८९ लाखांची वसुली झाली आहे. आणि सांडपाणी अधिभाराच्या १२ कोटी ७५ लाखांपैकी ५ कोटी ९३ लाखांची वसुली झाली आहे.