कोल्हापूरकरांनो, मास्क वापरा अन्यथा कारवाईला सामोरे जा… : आयुक्तांचा इशारा

0
48

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिवाळी साजरी करतानाच कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घ्या. घरातून बाहेर पडताना सर्वांनीच मास्क वापरणे तसेच सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक आहे, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज (सोमवार) दिला.

डॉ. बलकवडे यांनी सांगितले की, कोरोना संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी महापालिकेने प्रतिबंधक उपाययोजना जारी केल्या असून या प्रतिबंधक उपाययोजनांचे संपूर्ण शहरवासीयांनी काटेकोर पालन करावे. शहरातील सर्व व्यापारी- दुकानदारांनीही मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही, वस्तूही नाही ही मोहीम कटाक्षाने राबवावी. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासन, केएमटी अणि पोलिसांची पथके कोल्हापूर शहरात कार्यरत ठेवली आहेत. त्यांना दडात्मक कारवाई वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.