इंदिरा गांधी महिला सूत गिरणीच्या चेअरमन पदी किशोरी आवाडे…

0
140

रांगोळी (प्रतिनिधी) : इंदिरा गांधी महिला सहकारी सूत गिरणी लि. शिवनाकवाडी या संस्थेची सन २०२०-२१ ते २०२५-२०२६ कालावधीसाठीच्या पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली. यामध्ये माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांची सूत गिरणीच्या चेअरमन पदी तर व्हाईस चेअरमनपदी संगिता नरदे यांची निवड करण्यात आली. यावेळी जि. प. सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यामध्ये सात नवीन चेहऱ्यांना संचालकांमध्ये संधी देण्यात आली. 

यावेळी नवमहाराष्ट्र सूतगिरणीचे व्हा. चेअरमन व माणगाव सरपंच राजू मगदूम, निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे, संचालिका आदी उपस्थित होते.