पुणे (प्रतिनिधी) : संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार (वय ७०) यांचे आज (शनिवार) पहाटे निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर  आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांनी २०१८ मध्ये ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते.  मराठी रंगभूमीसाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली. आपल्या अभिनयाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर एक वेगळी ओळख निर्माण केली होती. कीर्ती शिलेदार यांचे जयराम आणि जयमाला शिलेदार हे आईवडील होत.