कोल्हापूरचे राजेपण : महापौर निलोफर आजरेकर

0
51

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे नातू राजकुमार यशराजराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आयसोलेशन येथे नव्याने स्थापन केलेल्या कोविड केअर सेंटरसाठी ५ लाखांचा जनरेटर देण्याचे जाहीर केले.

माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी त्यांचे चिरंजीव राजकुमार यशराजराजे छत्रपती यांचा वाढदिवस साजरा न करता कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांसाठी १ हजार सॅनिटायझर बॉटल्स, १ हजार मास्क, ५०० फेसशिल्ड, २५० पीपीई किट आणि ५० गाऊन महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे आज (गुरुवार) सुपूर्द केले.

न्यू पॅलेस येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमास श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती, महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक अर्जुन माने, राजाराम गायकवाड, रत्नेश शिरोळकर, उदयोजक तेज घाटगे, प्रविण इंगळे, प्रविणसिंह घाटगे, आशपाक आजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपायोजनांसाठी शहरवासियांनी अधिकाधिक मदत करण्याचे महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज प्रत्यक्ष राजेघराण्यांनीही कोरोनाच्या उपाययोजनासाठी मदतीचा हात दिला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here