कोल्हापूर (प्रतिनिधी) :  येथील रेल्वे स्टेशन गेट जवळून एका किशोरवयीन मुलाचे अपहरण झाले आहे. गणेश ज्ञानेश्वर कोळी (वय १५, रा. रमणमळा, मूळ रा. रेणुकानगर, पाचगाव) असे अपहरण झालेल्या या मुलाचे नाव आहे. याची नोंद शाहुपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

गणेश कोळी याचे दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वा. कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन गेट जवळून अज्ञाताने अपहरण केले आहे. त्यामुळे हा मुलगा कोणाला निदर्शनास आल्यास किंवा याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास ०२३१-२६६१७३३ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन शाहूपुरी पोलिसांनी केले आहे.