खच्याक मामांनी अखेरच्या व्हिडिओमध्ये दिला ‘हा’ मौल्यवान संदेश (व्हिडिओ)

0
1037

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘नाही तटत… नाही अडत’, असे म्हणत कोल्हापूरकरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या खच्याक मामांनी जाता जाता कोरोनाबाबत एक मौल्यवान संदेश दिला आहे. त्यांचा अखेरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांनी मास्कचा वापर केलाच पाहिजे, असे या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात खच्याक मामा उर्फ बाबुराव पाटोळे हे चांगलेच चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. कोरोनासारख्या भयान परिस्थितीमध्ये कोल्हापूरकरांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे काम त्यांच्यामुळेच घडले होते. खच्याक मामांनी आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये देखील लोकांना हसविले आहे. आणि कोरोनावर जरी लस आली असली, तरी सर्वांनी मास्कचा वापर करा. नियमांचे पालन करा, अशी सूचना त्यांनी केली आहे.