कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोरगरीब, निराधार, असाह्य लोकांसाठी शासकीय योजनेतील पेन्शन हक्काची आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थीला शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांनी कार्यरत रहावे, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक तहसीलदार कार्यालयात तहसीलदार श्रीमती मैमुन्निसा संदे आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र पायमल यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी आमदार जाधव यांनी समितीला मार्गदर्शन केले.

या बैठकीत एकूण १४० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना ८४ प्रकरणे, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना २,  श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ५४ अशी एकूण १४० प्रकरणे मंजूर करण्यात आली.

या बैठकीस संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य मिलिंद वावरे, दिपाली शिंदे, शशिकांत बिडकर, सुनील देसाई, विशाल चव्हाण, चंदा बेलेकर, रफिक शेख आदी उपस्थित होते.