रशिवडे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवेमधील मंडल अधिकारी विशांत भोसले (वय ४९) याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले. भोसले याने सातबारा उताऱ्यामधील डायरीत नाव नोंद करण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. भोसले याचे कार्यालय शेळेवाडी येथील ग्रामपंचायत शेजारी आहे. येथूनच तो कसबा वाळवे सर्कलमधील काम चालवत होता. याच ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून ही कारवाई केली. नुकतेच माजगांव तालुका राधानगरी येथील झालेल्या बेकायदेशीर उत्खननात चुकीचा पंचनामा केल्याचा आरोपही भोसलेवर होता