मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानची मुलगी अभिनेत्री सारा अली खानचा आज (१२ ऑगस्ट) वाढदिवस आहे. साराला २६ व्या वाढदिवसानिमित्त  अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान साराची सावत्र आई करीना कपूर खानने देखील केलेल्या शुभेच्छांच्या पोस्टने  सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला साराचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केलेले आहे. हा फोटो शेअर करत तिने, ‘वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, हा वाढदिवस तुझा आतापर्यंतचा सर्वात चांगला वाढदिवस असू दे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

साराने करीनाची ही पोस्ट रिपोस्ट केली आहे. त्यासोबत करीनाचे आभार देखील मानले आहे. करीनासोबतच, बॉलिवूडमधील इतर कलाकारांनी देखील सारासाठी पोस्ट केली आहे. विशेष म्हणजे करीना साराची सावत्र आई असून ही त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण नातं आहे. सारा आणि करीना या दोघींची चांगली मैत्री असून त्यांच्यातलं बॉण्डींग अनेक वेळा पाहायला मिळाले आहे.