शिंगणापूरातील कराटे शिक्षकाला मुलीची बदनामी केल्याप्रकरणी दंड…

0
309

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील शिंगणापूरतील कराटे शिक्षकाने १५ वर्षाच्या मुलगीला वडिलांना ठार मारण्याची धमकी देवून अश्लील चित्रफित, फोटो दाखवून तिच्यावर अत्याचार केला. तसेच स्व हस्ताक्षरात लिहलेले ‘बिन लग्नाची सोड’ या नावचे २१९ पानाचे पुस्तक लोकांना वाटून बदनामी केली. या प्रकरणी आज (सोमवार) या शिक्षकाला जिल्हा व सत्र न्यायालयाने २५ हजारांची दंडाची शिक्षा सुनावली. पांडूरंग रंगराव घोडसे (रा. शिंगणापूर, ता.करवीर मूळगाव माजगाव, ता.पन्हाळा) असे त्याचे नाव आहे.

पांडूरंग घोडसे हा कराटे शिक्षक असून त्याच्याकडे पन्हाळा तालुक्यातील मुलेमुलीं कराटे शिकण्यासाठी १९९८-९९ पासून जात होत्या. दरम्यान १५ वर्षाच्या मुलीला घोडसे याने वडिलांना ठार मारण्याची धमकी देवून अश्लील चित्रफीत फोटो दाखवून तिच्यावर अत्याचार केला. तर स्वहस्ताक्षरात लिहलेले ‘बिन लग्नाची सोड’ या नावचे २१९ पानाचे पुस्तक लोकांना वाटून पिडीतेची बदनामी केली. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यामध्ये सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी १५ साक्षीदार तपासले.

तर शेजारील प्रिंटिंग प्रेसमधील कर्मचारी व हस्ताक्षर तंज्ञाचा अभिप्राय ग्राह्य धरून पांडुरंग गोडसे याला कलम ५०१ व ५०२ खाली दोषी ठरवून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम.आर.पाटील यांनी २५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. यामधील २० हजार रुपये पिडीतेला देण्याचे ही आदेश यावेळी न्यायालयाने दिले आहेत. तर दंडाची शिक्षा न भरल्यास आरोपी घोडसे याला ६ महिने तुंरुगावासची शिक्षा सुनावण्यात आली आहे.