‘कराची स्वीट्स’; शिवसेनेची ‘ती’ भूमिका नव्हे : संजय राऊत   

0
44

मुंबई (प्रतिनिधी) : वांद्रे येथील  कराची स्वीट्स  आणि पाकिस्तान यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे या दुकानाच्या नावात बदल करण्याच्या मागणीत काहीच तथ्य नाही. नावात बदल करण्याची मागणी करणे ही शिवसेनेची भूमिका नाही, असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी ट्विट  करत  स्पष्ट केले आहे.

शिवसेना कार्यकर्ते नितीन नांदगावकर यांनी कराची स्वीट्स या दुकानाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी दुसरे नाव ठेवण्याची विचारणा दुकान मालकांना केली आहे. यावर  संजय राऊत यांनी खुलासा करत पक्षाची बाजू स्पष्ट केली. कराची बेकरी आणि कराची स्वीट्स हे दुकान मागील ६० वर्षांपासून मुंबईत आहे. त्यांचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही.  त्यामुळे या दुकानाचे नांव बदल्याची मागणी करण्याचा प्रश्नच येत नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेना कार्यकर्ते नितीन नांदगावकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात दुकान मालकाकडे दुकानाचे नाव आजोबा किंवा वडिलांच्या नावावरुन ठेवण्याची मागणी करताना दिसत आहेत. त्यानंतर यावर चर्चा सुरू झाली आहे.