जिल्ह्यात कन्नड भाषेतील फलक लावल्यास दुकाने बंद करू : संजय पवार (व्हिडिओ)  

0
24

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दुकानावर कन्नड भाषेतील फलक आजपासून  दिल्यास फलक फाडून दुकान बंद करू, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आज (बुधवार) येथे दिला. दरम्यान, काही दुकानावर कन्नड भाषेतील फलक लावल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिवसेने आक्रमक भूमिका घेत फलकांना काळे फासले. तसेच फलक फाडून टाकले.

यावेळी संजय पवार म्हणाले की, व्यवसाय होत नसल्याचे कारण देत काही व्यावसायिक दुकानावर कन्नड भाषेचा उल्लेख करत आहेत. सीमा सोडून गेल्यानंतर एकही मराठी भाषेचा फलक दिसत नाही. परंतु येथील काही व्यावसायिकांना शरम वाटली पाहिजे. ते व्यवसाय होत नसल्याचे कारण देत कन्नड भाषेतील फलक दुकानावर लावत आहेत. परंतु आजपासून कन्नड भाषेतील फलक दिसल्यास दुकाने बंद करू, असा इशारा संजय पवार यांनी दिला.