नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी आंदोलनावर टीका करताना आक्षेपार्ह ट्विट केल्याने बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला ट्विटरने कारवाई करत दणका दिला आहे. याबाबत एका निवेदनात ट्विटरने म्हटले आहे की, आम्ही लागू केलेल्या पॉलिसीच्या श्रेणीनुसार ट्विटर नियमांचे उल्लंघन करणार्‍या ट्विटवर आक्षेप घेत कारवाई केली जाते. त्याप्रमाणे कंगना राणावतच्या ट्विटवर आक्षेप घेत ते ट्विट डिलिट कऱण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्वीट कॅरिबियन पॉप स्टार रिहानाने केले होते. रिहानाच्या या ट्वीटवर अभिनेत्री कंगना राणावतने टीका करताना आम्ही तुमच्यासारखे मुर्ख नाही, असे टविट्‌ केले होते. त्यात तसेच कंगनाने शेतकरी आंदोलकांना अतिरेकी असे म्हणत भारताचे विभाजन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण ते शेतकरी नसून दहशतवादी आहेत, ज्यांना भारताची विभागणी करायची आहे. जेणेकरुन चीन आपल्या देशाचा ताबा घेईल आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवेल. शांत बसून राहा. आमचा देश विकायला आम्ही तुमच्यासारखे मूर्ख नाही, असे म्हटले होते. यासंदर्भात ट्विटरने आक्षेप घेत कंगनाचे ट्विट डिलिट केले आहे.