भाजपला खूश करण्यासाठी ‘कंगना’ने… : काँग्रेसने साधला निशाणा

0
84

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना नेत्या व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्या वादात आता काँग्रेसने उडी घेतली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कार्यालयासाठी नवी जागा विकत घेतली आहे. यावर कंगनाने ट्विट करत उर्मिलावर टीका केली होती. कंगनाच्या या ट्विटवरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपला पाठिंबा देऊन मला काहीच मिळाले नाही. पण उर्मिलाला काँग्रेसमुळे खूप फायदा झाला आहे, अशा टीकेचे ट्विट कंगनाने केले होते. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कंगनाला टोला लगावला आहे. खरंच, भाजपला खूश करून… भाजपला खूश करण्यासाठी महाराष्ट्र, मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यात आली. महाराष्ट्र भाजप आणि भाजपचे हे मोठे षडयंत्र होते, या हा कबूलीजबाब आहे. भाजपने नाक घासून महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही, अशी टीका सावंत यांनी केली आहे.