बिकिनीतील फोटोमुळे कंगना पुन्हा वादात…

0
128

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते.  ती नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत सापडते. कंगना आता पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. याचं कारण म्हणजे तो एक फोटो आहे. आता कंगनाने शेअर केलेल्या बिकीनी फोटोमुळे ती चर्चेत आली आहे.

थलायवीचं शूटिंग संपवून कंगना सुट्या एन्जॉय करायला मेक्सिकोला गेली आहे. आपल्या भटकंतीचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती चक्क बिकीनीमध्ये दिसत आहे. एरवी संस्कृतीबद्दल बोलणाऱ्या कंगनाने चक्क बिकीनी घातली म्हणून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. यावेळी, कंगणाने सुप्रभात मित्रांनो, मेक्सिको जगातल्या सुंदर देशांपैकी एक देश आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही असं सुंदर देश. मेक्सिकोच्या किनाऱ्यावर काढलेला हा पहिला फोटो आहे. हा पाहून नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल करायला सुरूवात केली.