कमल कटारिया यांचा ‘आप’कडून सत्कार

0
18

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना काळात विमानतळावर सुरक्षेसाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजना आणि सुविधा उपलब्ध करून दिलेल्याबद्दल कोल्हापूर विमानतळाला ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे कोल्हापूर विमानतळ हे महाराष्ट्रातील एकमेव विमानतळ असल्याने कोल्हापूरकरांसाठी ही गौरवाची बाब ठरली आहे. या सन्मानाची दखल घेत आम आदमी पार्टीच्या वतीने विमानतळ संचालक कमल कटारिया यांची भेट घेऊन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

फ्लाईट रन-वे चे रुंदीकरण, नाईट लँडिंग सुविधा, नवीन टर्मिनल यासाठी प्रयत्नशील असल्याचे कटारिया यांनी यावेळी सांगितले. विमानतळावर राबविण्यात आलेला उत्कृष्ट पाणी व्यवस्थापनामुळे या अगोदर ‘वॉटर डायजेस्ट’ पुरस्कार कोल्हापूर विमानतळाला मिळाला आहे. ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्’ने घेतलेली दखल ही कोल्हापूरसाठी अभिमानास्पद असल्याचे देसाई यांनी सांगितले. याप्रसंगी युवाध्यक्ष उत्तम पाटील, उपाध्यक्ष संतोष घाटगे, आदम शेख, बसवराज हदीमनी उपस्थित होते.