कळे वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू     

0
1162

कळे  (प्रतिनिधी)  : पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये कळे  वाहतूक पोलिसांनी दुचाकी व चारचाकी वाहनधारकांची कागदपत्रे तपासणी व दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू  केली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी  कारवाई टाळण्यासाठी गाडीची सर्व कागदपत्रे, विमा, पीयुसी, लायसन्स आदी कागदपत्रे जवळ ठेवणे गरजेचे झाले आहे.

तसेच फँन्सी नंबर प्लेट लावणे,  अल्पवयीन मुलांना गाडी चालविण्यास देणे,  तिबल सीट गाडी चालवणे, असे प्रकार आढळल्यास वाहनधारकांवर  कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.  त्यामुळे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकांनी आपल्या वाहनांची सर्व कागदपत्रे जवळ ठेवावीत, असे आवाहन कळे वाहतूक पोलिसांनी केले आहे.