बाजारभोगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा : दोघे ताब्यात

0
90

कळे (प्रतिनिधी) : बाजारभोगाव (ता. पन्हाळा) येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून वैभव भगवान पाटील (वय ३०, मोहिते गल्ली, बाजारभोगाव) व मालक विशाल वारकर (रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) यांना रंगेहाथ पकडले.

बाजारभोगाव बसस्थानक शेजारी असलेल्या एक दुकानाच्या मागील बाजूस मटका घेतला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कळे पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी दुपारी १ च्या सुमारास छापा टाकला. या वेळी वैभव पाटील कल्याण मटका घेत असल्याचे आढळून आले. विशाल वारकर यांच्या सांगण्यानुसार आपण मटका घेत असल्याचे पाटील याने पोलिसांना सांगितले. या वेळी पोलिसांनी रोख १०५० आणि मोबाईल असा एकूण सहा हजार पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पो. ना. सरदार भोसले यांनी फिर्याद दिली. सपोनि प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.एस.एस.चव्हाण तपास करत आहेत.