काळबर यांची विधायक उपक्रमातून समाजाशी नाळ जोडलेली : मुश्रीफ

0
21

कागल (प्रतिनिधी): नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांचे माता-भगिनींशी घट्ट ऋणानुबंध आहेत, असे प्रतिपादन आ. हसन मुश्रीफ यांनी केले. काळबर यांनी कागलमध्ये आयोजित केलेला ‘श्रावणी महोत्सव’ मोठ्या उत्साहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून आ. मुश्रीफ बोलत होते. 

राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष शीतलताई फरकटे, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, तात्यासाहेब पाटील, पांडुरंग काळबर आणि माता-भगिनी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. मुश्रीफ म्हणाले, काळबर यांनी कोरोनाकाळात प्रभागातील रुग्णांसाठी चांगले कार्य केले. महापूर काळात गोरगरिबांना धान्य वाटप केले. विधायक उपक्रमाद्वारे ते नेहमीच समाजाशी जोडले गेले आहेत. काळबर यांनी श्रावणी महोत्सवाचे आयोजन करून महिलांच्या अंतर्गत कलागुणांना वाव देण्यासाठी चांगले व्यासपीठ निर्माण केले. केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप  माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्षा शितल फराकटे यांची भाषणे झाली.

महोत्सवाचे संयोजक प्रवीण काळबर यांनी भविष्यातही महिलांसाठी विधायक उपक्रम राबवण्यात येतील असे सांगितले. कार्यक्रमास तात्यासाहेब पाटील, संगीता गाडेकर, सविता माने, मंगल गुरव, आशाकाकी माने, आशाकाकी जगदाळे, अंजुम मुजावर, पद्मजा भालबर, संजय चितारी संजय ठाणेकर, अस्लम मुजावर, सौरभ पाटील, इरफान मुजावर, सतीश घाडगे, विवेक लोटे यांच्यासह महिला उपस्थित होत्या

विविध स्पर्धांचा निकाल ; पाककला स्पर्धा-  छाया सूर्यवंशी, रजिया नायकवडी, शुभांगी कांडेकरी. पारंपरिक वेशभूषा- गौरी धनवडे, शब्द नाईक, पायल रेडेकर, उखाणा स्पर्धा-  सुलोचना लोहार, जायदा नायकवडी, स्वाती उपलाने, सूप नाचवणे व घागर घुमवणे- मयुरी घाटगे, सुप्रिया पोवार, वत्सला पोवार,संगीत खुर्ची- जबीन आलासकर, संजीवनी कदम, कांचन कारंडे.