कागलचा उपकोषागार लाचलुचपतच्या जाळ्यात…

0
169

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुरगुडच्या स्थानिक रुग्णालयातील औषध खरेदीची बीले मंजूर करण्यासाठी दोन हजारांची लाच स्विकारताना कागल येथील उपकोषागार लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. उपकोषागार अधिकारी मिलिंद कुलकर्णी (वय ५५, रा. अरुणोदय को.ऑप.सोसायटी, राजेंद्र नगर, कोल्हापूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ही दुसरी कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई उपायुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पेालीस उपअधीक्षक अदिनाथ बुधवंत,पोलिस सहाय्यक फौजदार संजू बंबर्गेकर, पोलीस हवालदार शरद पोरे, पोलीस नाईक कृष्णात पाटील,पो.काँ.संदीप पडवळ,मयूर देसाई ,रुपेश माने ,विष्णू गुरव यांच्या पथकाने केली.