कागल पं. स. तर्फे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार…

0
39

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त एकात्मिक बालविकास प्रकल्प, पंचायत समिती कागल यांच्यावतीने कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या जिल्हा जनरल सेक्रेटरी उज्वला पाटील यांच्यासह समाजात प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महिलांचा सत्कार आज (सोमवार) करण्यात आला.

आरोग्य, संघटन आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी, माजातील सर्वसामान्य महिलांना न्याय, बचतगटाच्या माध्यमातून गोरगरीब महिलांचे आर्थिक सक्षमीकरण केल्याबद्दल वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार कागल पंचायत समिती येथे आज करण्यात आला. कोरोनाच्या काळात आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल उज्वला पाटील यांचा सत्कार कागल पंचायत समितीच्या सभापती पुनम महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी उपसभापती अंजना सुतार, बीडीओ सुशील संसारे, सहाय्यक बीडीओ माळी, संगीता तोडकर आदी उपस्थित होते.