मुंबई (प्रतिनिधी) : दैनंदिन उपयोग येणाऱ्या काडिपेटीच्या किंमतीत आता वाढ होणार आहे. त्यामुळे १ रुपयाला मिळणारी काडीपेटी आता २ रुपयांना मिळणार आहे. या नव्या किंमतीमध्ये १ डिसेंबरपासून वाढ होणार आहे. भारतातल्या पाच प्रमुख माचिस उद्योगांच्या प्रतिनिधींनी सर्वसंमतीने हा निर्णय घेतला आहे.
सन २००७ मध्ये काडिपेटीची किंमत ५० पैशांनी वाढली होती. यावेळी काडीपेटीच्या निर्मात्यांनी सांगितले की, काडीपेटी बनवण्यासाठी १० पेक्षा अधिक कच्च्या मालाची गरज असते. परंतु कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. ज्यामध्ये सध्याच्या किंमतींमध्ये काडीपेटी विकणे शक्य नाही. तसेच एक किलोग्राम लाल फॉस्फोरस ४२५ रुपयांनी वाढून ८१० रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.