टोप (प्रतिनिधी) : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कक्षेत मानव अधिकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी शिरोली पुलाची येथील ज्योतीराम पोर्लेकर यांची निवड झाली. त्यांच्या निवडीचे पत्र राज्य उपाध्यक्ष संजय पाटील यांनी यांनी दिले. यावेळी विभागप्रमुख प्रकाश चौगुले, अमित शिंदे, युवराज खवरे, संजय पवार-वाईकर, सचिव अमित चव्हाण उपस्थित होते.