कुरुंदवाड (प्रतिनिधी) : दहाव्या दक्षिण महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत कुरुंदवाड (ता.शिरोळ) येथील ज्योती नागेश गायकवाड हिने प्रथम क्रमांक पटकाविला.

नृसिंहवाडी येथे झालेल्या कराटे चॅम्पियन स्पर्धेत दक्षिण महाराष्ट्रातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात ३५ किलो वजनी गटात ज्योती गायकवाड हिने प्रथम क्रमांक पटवून गोल्ड मेडल व रेंजर सायकल मिळवली. तिला मार्गदर्शक यासीन झांबरे व आई- वडील यांचे प्रोत्साहन मिळाले.