संभापूरच्या उपसरपंचपदी ज्योती भोसले बिनविरोध

0
201

टोप (प्रतिनिधी) :  संभापूर (ता. हातकणंगले)  उपसरपंचपदी ज्योती तानाजी भोसले यांची बिनविरोध निवड झाली. संभापूर ग्रामपंचायतीवर जय गणेश पॅनेलची सत्ता असून पॅनेलचे लोकनियुक्त सरपंचासह ६ सदस्य आहेत. गटांतर्गत समझोत्यानुसार सर्जेराव मोहिते यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ज्योती भोसले यांची निवड  केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश झीरंगे होते.

नूतन उपसरपंच ज्योती भोसले यांनी नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत गावच्या विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे  निवडीनंतर सांगितले. यावेळी  मावळते उपसरपंच सर्जेराव मोहिते,  ज्येष्ठ नेते मारुती भोसले,  तानाजी भोसले, स्वरूप भोसले, संपत कारंडे,  अरुण कारंडे, रावसो कारंडे, अवधूत झीरंगे, ग्रामसेविका आसमा मुल्ला आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल फटाक्यांची उधळण करत जल्लोष केला.