पत्रकारिता विद्यार्थ्यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव…

0
58

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षि छ. शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त ‘कृतज्ञता पर्व’ साजरे झाले. या लोकोत्सवात शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.

यावेळी पत्रकारिता विभागाचे डॉ. शिवाजी जाधव, माहिती अधिकारी वृषाली पाटील, सहायक संचालक फारुक बागवान, डॉ. सुमेधा साळुंखे, माहिती सहायक एकनाथ पोवार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.