कोल्हापूर (प्रतिनिधी) : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या प्रबोधिनी संस्था नेहमीच विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणेसाठी कार्यरत आहे.  कोरोनाच्या संकटामध्ये कामाची पद्धत बदलून सध्या ऑनलाईन वर्क, वर्क फॉर्म होम अशी संकल्पना पुढे येत आहे. त्यामुळे अशा रोजगाराच्या संधीला भविष्यात सुरक्षित रोजगाराचे क्षेत्र म्हणून पाहिले जात आहे. 

याच अनुषंगाने बदलत्या कामाच्या कार्यपद्धतीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्याच्या उद्देशाने कोल्हापूर येथील नामवंत बीपीओ कंपनीमध्ये नोकरीची संधी विद्या प्रबोधिनी कौशल्य विकास रोजगार व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. सदर नोकरीसाठी २१ ते २९ या वयोगटातील कोणत्याही शाखेतील स्त्री/पुरुष पदवीधर उमेदार पात्र आहे.  त्यामुळे जास्तीत-जास्त उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी विद्या प्रबोधिनी शाहूपुरी ४ थी गल्ली शहाजी लॉ कॉलेजसमोर असलेल्या कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहन विद्या प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष राहुल चिकोडे, संचालक नितीन कामत यांनी केले आहे.