Published June 3, 2023

मुंबई : जेजे रुग्णालयातील प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा राज्य सरकारने मंजूर केला आहे. जेजे रुग्णालयातील नेत्र शल्यचिकित्सक विभागातील डॉक्टर, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख विद्यार्थ्यांना त्रास देतात, त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

या आरोपानंतर डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिनी पारेख यांच्यासह 9 डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे टाकले होते. या प्रकरणावर तात्याराव लहाने यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडत त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. यानंतर आता सराकरने त्यांनी दिलेला राजीनामा मंजूर केला आहे.

सरकारने राजीनामा मंजूर केल्यानंतर तात्याराव लहाने यांनी सांगितले की, ‘मी राजीनामा देत सरकारला मंजूर करण्याबाबत विनंती केली होती. सरकारने माझा राजीनामा मंजूर केला आहे. याबद्दल शासनाचा आभारी आहे.’ जेजे रुग्णालयातील वरिष्ठ डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्यावर निवासी डॉक्टरांनी अनेक गंभीर आरोप केलेत.

हे सर्व डॉक्टर आणि प्राध्यापक दादागिरी करतात आणि शस्त्रक्रिया करू देत नसल्याचे निवासी डॉक्टरांनी आरोप केले. हे आरोप करत जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. जेजे रुग्णालयातील 750 निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. विद्यार्थ्यांच्या या आरोपानंतर 9 डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे दिले होते.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023