‘जीतो’ने घेतली पूरग्रस्त जनावरांचीही काळजी….

0
10

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘जीतो’ संस्थेने फक्त पूरग्रस्तांचीच नव्हे तर त्यांच्या जनावरांचीही काळजी घेऊन एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.  पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामध्ये पूरग्रस्त कित्येक नागरिकांचे घरदार उदध्वस्त झाले. त्यांना जीतोच्या वतीने पुन्हा आधार दिला आहे.  पाण्याने जनावरांचा चाराही कुजून गेला होता. अशावेळी जीतोने मार्केट यार्ड आणि दसरा चौक येथे उभारण्यात आलेल्या चारा छावणीमध्ये चाऱ्याबरोबर पाच टन पशुखाद्याची उपलब्धता केली.

यासाठी अध्यक्ष जितेंद्र राठोड, गिरीश शहा सचिव, युवराज ओसवाल, राजीव परीख, अतुल शहा, अतुल पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे संस्थेने सांगितले.