जोतिबा रोडवर दागिन्यांची पर्स लंपास…

0
117

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी कोल्हापूरातील जोतिबा रोड येथून  सराफ दुकानाकडे चालेल्या महिलेची दागिन्यांची पर्स चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी नंदकुमार जगताप (वय २१, रा. कदमवाडी रोड )यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नंदकुमार जगताप हे सायंकाळच्या सुमारास महाद्वाररोड येथून मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी त्यांच्या आईसोबत जोतिबा रोड येथील एका सराफ दुकानाकडे जात होते. त्यावेळी त्यांनी जुने मंगळसूत्र त्यांच्या आई जवळ असणाऱ्या पर्समध्ये ठेवले होते. हे दागिने असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली. ही बाब त्यांच्या निदर्शनास येतात नंदकुमार जगताप यांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.