चरण येथील जवान अमित साळुंखे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0
615

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये (सीआरपीएफ) कर्तव्य बजावणारे चरण (ता.शाहूवाडी) येथील जवान अमित भगवान साळुंखे (वय३०) यांचे गुरूवारी (दि.१०) सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चरण गावात शोककळा पसरली आहे.

अमित साळुंखे  बालाघाट (मध्यप्रदेश) येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.  त्यांचे प्राथमिक शिक्षण रामगिरी विद्यालय चरण येथे तर बारावी पर्यंतचे शिक्षण सरुड महाविद्यालयात झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, २ वर्षांची मुलगी, बहीण, चार चुलते असा परिवार आहे.