पन्हाळ्यातील २५ ग्रामपंचायतीवर ‘जनसुराज्य’चा झेंडा  

0
275

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवार) पार पडली. कोडोली ग्रामपंचायतीवरील सत्ता राखण्यात आ. विनय कोरे यांना यश आले. तर निसटता विजय मिळवत शिवसेनेने कळे ग्रामपंचायतीची सत्ता मिळवली. पोर्ले ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील यांना पायउतार व्हावे लागले आहे. ४२ ग्रामपंचायतीपैकी सोमवारपेठ, आंबर्डे, उत्रे या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. काही ठिकणी संमिश्र स्थानिक आघाड्या विजयी झाल्या असल्या, तरी जनसुराज्य पक्षाने २५ ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व मिळवले आहे.  

नगरपरिषद सांस्कृतिक सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार रमेश शेंडगे, नायब तहसीलदार विनय कौवलवकर यांचे मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली.

जनसुराज्य पक्षाची सत्ता आलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे –

आपटी, नेबापूर, नावली, जेऊर, इंजोळे, बुधवारपेठ, आवळी, धबधबेवाडी, जाफळे, पोखले, मोहरे, आरळे, सातवे, पुनाळ, वाघवे, पोर्लेतर्फे ठाणे, सावर्डेतर्फे सातवे, केखले, निकमवाडी, कणेरी, दिगवडे, कोडोली, सोमवारपेठ, आंबर्डे, उत्रे.  

शिवसेनेची सत्ता आलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे –

कळे, तिरपण, नणुंद्रे, माजनाळ, म्हाळुंगेतर्फे बोरगांव

जनसुराज्य-काँग्रेस-शिवसेना –

हरपवडे, उंड्री, पुशीरेतर्फे बोरगांव, तेलवे, पैजारवाडी, सातार्डे, देवाळे, निवडे, पोंबरे, पोहाळेतर्फे बोरगांव, वारनूळ, पोहाळवाडी