ग्रा.पं. निवडणूक निकाल : पाडळीत जनसुराज्य पक्षाची बाजी  

0
424

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील पहिल्या ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. पाडळी ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाने एकहाती सत्ता मिळवली.  गोराई ग्राम विकास आघाडीने ११  जागांवर विजय मिळवत विरोधकांना चितपट केले. निकालानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करून गुलालाची उधळण केली.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला आज (सोमवार)  सकाळी ८  वाजता सुरुवात झाली.  हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला लवकरच सुरुवात झाली आहे.  मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी  मोठी गर्दी झाली आहे.