जयसिंगपूर येथे मेमोरियल चर्चमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा…

0
48

शिरोळ (प्रतिनिधी) :  जयसिंगपूर येथे ७५ वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जयसिंगपूर येथील ख्रिस्ती मंडळाच्या वतीने डॉ. एम. के. लोखंडे मेमोरियल चर्च येथे झेंडावंदन करण्यात आले. यावेळी प्रार्थना ढाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच चर्च परिसरामध्ये पोलीस उपनिरीक्षक स्नेहल टकले आणि महिला मंडळांच्या हस्ते वृक्षारोपण करुन हा स्वात्र्यंदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी चर्चेचे सेक्रेटरी साकिन आठवले, खजिनदार अजय लोखंडे, डॉ. प्रसन्न ढाले, सजू स्टॅनली, मधुकर ढाले, अविनाश आवळे, शमशोन सकटे, सुधीर ढाले, महिला आदी उपस्थित होते.