‘२६’ जानेवारीपासून जेल पर्यटनाला सुरुवात : गृहमंत्री अनिल देशमुख

0
213

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात पर्यटनासाठी नागरीकांना बाहेर पडणे कठीण झाले होते. यावर आता राज्य सरकारने एक वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात आता ‘जेल पर्यटन’ सुरू होणार आहे. यामुळे नागरिकांना हे कारागृह जवळून पाहता येणार आहेत. देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

गृहमंत्री म्हणाले की, पुण्यातील येरवडा कारागृहात ‘जेल पर्यटन’ सुरू करण्यात येणार आहे. २६ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. भारतात पहिल्यांदाच कारागृह पर्यटनाची महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे. पुण्यात ५०० एकरात येरवडा कारागृह आहे. येरवडा कारागृहाला ऐतिहासिक महत्व आहे. या कारागृहात अजमल कसाबला फाशी देण्यात आली. या कारागृहाची माहिती नागरिकांना व्हावी, म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.