सातारा (प्रतिनिधी) : माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही, अशा शब्दांत साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे नांव न घेता त्यांना जाहीर धमकी दिली आहे. जावळी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवेंद्रराजे भोसले पुढे म्हणाले की, माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही. माझ्या मागे कोणी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवणार ही आपली भूमिका आहे. आपला काटा जर कोणी काढत असेल, तर मग काट्याने काटा काढणार. मी पण मागे फिरणाऱ्यातील नाही. जर कोणी आडवेपणा करत असेल तर मी पण स्वभावाने आडवा माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा लढवून निवडून आलेला माणूस आहे, असेही ते म्हणाले.