पेट्रोल-डिझेल दराबाबत केंद्र सरकारला उशिरा सुचलं शहाणपण…

0
342

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलचे दर आतापर्यंतच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याने वाहनधारकांत मोठ्या प्रमाणात असंतोष वाढला आहे. याचा उद्रेक होण्याची शक्यता दिसू लागल्यानंतर केंद्र सरकारला बऱ्याच उशिरा जाग आली आहे. आता सरकारने हे दर नियंत्रणात आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

आज (बुधवार) पंतप्रधान कार्यालयाने इंधनाच्या वाढत्या दरावर बैठक घेत चर्चा केली. या बैठकीत पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याबाबत चर्चा झाली. वाहनधारकांतील संताप लक्षात घेऊन पेट्रोल आणि डिझेल अबकारी कर कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याचे संकेत मिळाले आहेत. आता या दरात किती कपात होणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.