अण्णा हजारेंना समर्थन देणं ही माझी चूक..!

दिग्दर्शक हंसल मेहता यांची प्रतिक्रिया

0
262

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मी ज्याप्रमाणे अरविंदला पाठिंबा दिला होता. त्याच विश्वासाने मी अण्णा हजारे यांचे समर्थन केले होते. पण अण्णा हजारेंना समर्थन देणं ही माझी चूक होती. मला याचं दुःख नाही आहे. कारण आपण सगळेच चुका करतो. मीसुद्धा ‘सिमरन’ सिनेमा केला होता, असे ट्विट करत बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  ३०  जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिद्धीत उपोषण करणार होते. मात्र, विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस  यांनी मध्यस्थी  केल्याने अण्णा हजारे  यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. यानंतर आता दिग्दर्शक हंसल मेहता यांनी एक ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.  त्यांच्या ट्विटची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.