पुणे (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या ट्वीटवर उत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खोचक टोला लगावला आहे. नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख ना ?, असे राणे यांनी म्हटले आहे.

नारायण राणे यांनी आज (सोमवार) महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुण्यातील  सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या ट्वीटबद्दल प्रश्न विचारला असता राणे यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला.