शिरोळ (प्रतिनिधी) :  शिरोळ तालुक्यामधील जांभळी गावातील चर्मकार समाजपासून ते दलित वस्तीकडे जाणारा रस्ता बऱ्याच वर्षांपासून खराब अवस्थामध्ये होता. या रस्त्यासाठी या भागातील नागरिकांनी कित्येक वेळा ग्रामपंचायत कडे लेखी अर्ज दिले आहेत. सध्या या रस्त्यावर दगड, मुरूम टाकून ते पसरवण्याचे काम चालू होते. परंतु, हे दगड आणि मुरूम रस्त्याच्या फक्त मध्यभागी पसरवण्यात आले आहे.

या रस्त्यासाठी लागणारे मटेरियल देखील या ठिकाणी नसल्याने हा रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. पूर्वी असलेल्या रस्त्यावरील झाडे झुडपे न काढताच या रस्त्यावर दगडव, मुरूम पसरवला जात आहे. येथे फक्त मध्यभागी रस्ता केला आहे. त्याचे फोटो अथवा चित्रीकरण करुन बील पास करण्याचा प्रयत्न सुरु आहे काय, ठेकेदारांचा राजरोसपणे चाललेला मनमानी कारभार आहे की ग्रामपंचायत जनतेची दिशाभूल करत आहे ? या सारखे प्रश्न आता जनतेसमोर पडले आहेत. हा रस्ता पूर्ण करण्यासाठी ग्रा. पं. सदस्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.