छ. संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले विजयदूर्ग, रामगड येथे स्वच्छता मोहीम…

0
26

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभागाच्यावतीने छ. संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले विजयदूर्ग आणि रामगड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेमध्ये किल्ले विजयदूर्ग येथील खलबत खाण्यासमोरील बाजू, तटबंदीवरील वाढलेली झाडेझुडपे, भुयारी मार्ग, आई भवानी मंदिरासमोरील आणि मागील बाजूला वाढलेले गवत काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. 

तसेच किल्ले रामगड येथे होळीचा दरवाजा, गणेश मंदिराबाहेरचा परीसर, तटबंदीवरील वाढलेली झाडेझुडपे, बुरूज स्वछ करण्यात आले. छत्रपतींचे गडकिल्ले हे मनाला शक्ती उर्जा देणाऱ्या वास्तू आहेत. यांचे जतन, संवर्धन, संरक्षण झाले पाहिजे. ज्यामुळे पुढील येणाऱ्या पिढीला हा इतिहास समजून प्रेरणा भेटणार आहे. याच भावनेतून गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य महिन्यातून १ दिवस महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यावर जाऊन अशा विविध स्वच्छता मोहीमा राबण्याचे काम गेली अनेक वर्षांपासून सातत्याने करत आहे.

या मोहीमेचे आयोजन कोकण विभागाचे अध्यक्ष शुभम राणम, सपंर्क प्रमुख शुभम फाटक, अभिजीत तिर्लोटकर यांनी केले. तसेच या मोहिमेमध्ये विक्रांत मोरये, सतीश राणम, विनायक कुडकर, राजेश काळे, आकाश राणम, रघुनाथ राणम, पंकज पुजारी, अनिकेत घाडी, नितीन नारकर, चेतन गुरव आदींनी सहभाग नोंदवला.