कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवशाहूंच्या रक्ताचे आणि विचारांचे वारसदार संभाजीराजे छत्रपती यांना सर्वपक्षियांनी मिळून अपक्ष म्हणून राज्य सभेवर पाठवावे. अशी मागणी कोल्हापूरातील सर्व मुस्लिम समाजाने केल्याचे मुस्लिम बोर्डाचे चेअरमन गणी आजरेकर आणि प्रशासक कादर मलबारी यांनी सांगितले.
तसेच संभाजीराजे छत्रपती हे मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी जितक्या आग्रहाने लढले तितक्याच आग्रहाने इतर समाजासाठी काम केले आहे. कोल्हापूरच्या मुस्लिम समाजासाठी करवीर छत्रपतींचे योगदान अमुल्य आहे. मराठा आंदोलनामध्ये मुस्लिम समाजाला समाविष्ठ करून सर्व जातीधर्माना एकत्रित करणेचे काम छत्रपती घराण्याने केलेले आहे. शाहू महाराजांची विचारसरणी आणि केलेले काम पूर्ण भारत विसरणार नाही. छत्रपती शाहू महाराज यांचा कृतज्ञा पर्व सुरू आहे. पूर्ण महाराष्ट्र या कृतज्ञता पर्वामध्ये सामील होऊन संभाजीराजेंना अपक्ष खासदार करावे.
सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन फक्त राजर्षि छ. शाहू महाराजांना कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अवसर सोडून नये. महाराष्ट्रातील सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र घेऊन जाणाऱ्या छत्रपतींच्या वारसाला राज्यसभेत पाठवून त्यांचा उचित सम्मान करावा. असे आवाहन गणी आजरेकर आणि प्रशासक कादर मलबारी यांनी केले आहे.