छ. प्रमिलाराजे रुग्णालयातील अस्थायी डॉक्टरांचे काळ्या फिती लावून आंदोलन…

0
74

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व अस्थायी वैद्यकीय अधिकारी यांचे सरसकट नियमितीकरण करावे. यासाठी कोल्हापूरातील छ. प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय येथे आज (बुधवार) पासून सर्व अस्थायी वैद्यकीय अधिकारी यांनी काळया फिती लावून कामकाज पाहत आंदोलन करीत आहेत.

छ. प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये मागील ८ महिने सर्व अस्थायी वैद्यकीय अधिकारी कोरोना रुग्णांच्या उपचार सेवेत अव्याहतपणे सक्रिय आहेत. गेली अनेक वर्षे सदर वैद्यकीय अधिकारी अस्थायी स्वरुपात भविष्याच्या चिंतेत आणि तुटपुंज्या वेतनावर राबत आहेत. त्यांचे नियमितीकरण करण्यासाठी प्रत्येक वेळी शासनाने टाळाटाळ केली आहे. त्यामुळे आजपासून छ. प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील सर्व अस्थायी वैद्यकीय अधिकारी यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्याकरीता काळया फिती लावून कामकाज पाहत आंदोलन केले आहे. सध्या सुरु असलेल्या अस्थायी सहाय्यक प्राध्यापक यांच्या संपात सहभागी होण्या संदर्भात राज्य स्तरावरील वैद्यकीय संघटनेमध्ये निर्णय प्रक्रिया सुरु आहे.

या आंदोलनात डॉ. विकास जाधव, डॉ. विजय गाढवे,डॉ. व्यंकटेश पवार, डॉ. गिरीश कांबळे, डॉ. शीतल हरगुडे, डॉ. रंजीत जाधव, डॉ. गुरुनाथ दळवी, डॉ. प्रतीक, डॉ. सुप्रिया लोखंडे, डॉ. जाहीर पटवेगार, डॉ. आदेश रोडे, डॉ. दस्तगीर जमादार यांचा समावेश होता.