कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या दोन ते तीन वर्षांत कान, नाक घसा प्रभागाच्या छ. प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयमधील डॉक्टरनी अतिशय चांगल्या प्रकारे काम करून अनेक रुग्णांना नवसंजीवनी दिली आहे. कानापासून मेंदूकडे जाणारा रोग आणि त्यामुळे मेंदूमध्ये होणारी पसची गाठ, चेहऱ्याच्या नसेमध्ये होणारा वाकडेपणा, स्वरयंत्रावर गाठ यासारख्या अनेक अवघड शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी सांगितले.

कोरोना काळात कान,नाक व घसाशास्त्र विभाग, कोरोना रुग्णांसाठी पूर्ण क्षमतेने काम करत होता. २६ नोव्हेंबर २०२० नंतर कोरोनाच प्रार्दुभाव कमी झाल्यावर कान,नाक घसा विभाग, विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत झाला आहे. सध्या हा विभाग सर्व अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह सुसज्ज झाला आहे. खाजगी दवाखान्यात लाखो रुपये खर्च करून गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्याचप्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या सीपीआर मधून केल्या जातात. त्यामुळे याचा रुग्णांनी लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

या २ महिन्याच्या काळात विभागामध्ये सर्व प्रकारच्या कान, नाक व घसा शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत. त्यामध्ये कानांपासून मेंदूकडे जाणारा रोग आणि त्यामुळे मेंदूमध्ये होणारी पस ची गाठ,चेहऱ्याच्या नसेमध्ये होणारा वाकडेपणा,स्वरयंत्रावर गाठ यासारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कान, नाक व घसा विभागाने डॉ. लोकरे  यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वासंती पाटील, डॉ. मिलींद सामानगडकर यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत.

गेल्या वर्षात अवघड शस्त्रक्रिया ६८४, साध्या १२३३ अशा एकूण १९१७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावेळी डॉ. उल्हास मिसाळ भूलतज्ञ विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखालील भूलतज्ञ डॉक्टरांचा सहभाग होता. या सर्व शस्त्रक्रियांमध्ये अधिष्ठाता डॉ. मोरे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे यावेळी सांगितले.