कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भवानी मंडप येथील खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रेश्मा माने आणि तिचे वडील अनिल माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय जलतरणपटू पृथ्वीराज जगताप यांच्या हस्ते रेश्मा माने तसेच अनिल माने यांचा सत्कार करण्यात आला.

पृथ्वीराज जगताप म्हणाले की, रेश्मा माने यांचा आदर्श घेऊन अनेक मुलींनी क्रीडा क्षेत्रात आपले करिअर करावे. जेणेकरुन भारताला ऑलम्पिकमध्ये अधिक मेडल प्राप्त होतील. रेश्मा माने यांनी, मी लवकरात लवकर ऑलम्पिक क्वालिफाय होऊन भारतासाठी मेडल आणणार असा ही विश्वास व्यक्त केला.

रेश्मा माने यांनी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ६३ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावणारी ती पहिली महाराष्ट्रीयन कुस्तीपटू आहे. तसेच देश-विदेशातील विविध स्पर्धांमध्ये तिने २५ पेक्षा जास्त सुवर्णपदक पटकावली आहेत.

यावेळी मिलिंद जाधव, महेश नार्वेकर, सुजित सुतार, पुरुषोत्तम पाटील, चिन्मय वेळापुरे, शुभम जिरगे, धोंडीराम चोपडे, मतीन शेख, मानसिंग पाटील, सचिन जाधव, संदीप जाधव, संतोष जाधव, राहुल चौधरी आदी उपस्थित होते.