नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आतापासून उपाययोजना सुरु केल्या आहेत. जेणेकरुन देशात या विषाणूला येण्यापासून रोखता येईल. भारताने ही आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची योजना तूर्तास पुढे ढकलली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने याला दुजोरा दिलाय.

डीजीसीएने असेही नमूद केले आहे की, ते योग्य वेळी याबाबतचा निर्णय कळवतील. गेल्या महिन्याच्या शेवटी झालेल्या बैठकीत, केंद्र सरकारने जाहीर केले होते की १५ डिसेंबरपासून भारतात व्यावसायिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू होतील. वीस महिन्यांहून अधिक कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती.

सरकारने ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेतला. कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरु करण्याबाबतचा निर्णय पुढे ढकलला.