कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील एकूण २९ नवीन रास्तभाव धान्य दुकानांसाठी २०२२ सालचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. इच्छुक संस्था, महिला बचत गटांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी कागदपत्रांसह दि. ४ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

रास्तभाव दुकान व गावाचे/क्षेत्राची नावे पुढीलप्रमाणे : कोल्हापूर शहर- शिवाजी पेठ, शाहूपुरी, राजेंद्रनगर व रविवार पेठ. इचलकरंजी शहर- आर.के.नगर इचलकरंजी, करवीर- मुडशिंगी, निगवे खालसा, नंदगाव, उजळाईवाडी व कोगील खुर्द. भुदरगड- सालपेवाडी व बिद्री, पेठ शिवापूर, हातकणंगले- पारगाव, यळगूड व कोरोची, राधानगरी- सरवडे, कागल-कागल शहर. चंदगड- इसापूर, बेळेभाट, तडशिनहाळ व दाटे. शाहूवाडी- आकुर्ले, मोळावडे, टेकोली व भेडसगाव, गगनबावडा- अणदूर व तळीये बुद्रुक. पन्हाळा- पोर्ले तर्फ बोरगाव व आजरा- इटे.

अर्जदार संस्थांनी अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी संबंधित तहसीलदार कार्यालय व शहर पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.