गांधीनगरच्या सरपंच रितू लालवाणी यांना आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार

0
236

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बेळगाव येथील नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांच्यातर्फे आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार गांधीनगरच्या (ता. करवीर) सरपंच रितू हरेश लालवाणी यांना जाहीर झाला आहे. बेळगाव येथे २८ मार्च रोजी आयोजित सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, ब्रिगेडियर सुधीर सावंत, सुरेश पाटील, अॅड. अनिल शिंदे व मनोहर वडर यांनी पुरस्कार समितीच्या वतीने ही माहिती दिली. कोरोना महामारीच्या काळात सामाजिक भान राखत केलेली विशेष सेवा व दिलेल्या योगदानाबद्दल रितू लालवाणी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सन्मानचिन्ह, म्हैसुरी फेटा व विशेष गौरव प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.