‘आप’च्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ : मानसिंग बोंद्रेंविरुद्ध गुन्हा  

0
346

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचेविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फिर्याद दाखल केली. 

महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पक्षाचे सुमारे १२ ते १५ कार्यकर्ते शालिनी पॅलेस भागात प्रचार मोहीम राबवत होते. त्या वेळी तिथे आलेल्या मानसिंग बोंद्रे यांनी मद्यधुंद अवस्थेत ‘तुम्ही इथं प्रचार करायचा नाही, केलात तर बघून घेईन’ असं म्हणत या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली. या वेळी बोंद्रे व संदीप देसाई यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली. यानंतर ‘आप’ कार्यकर्त्यानी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात बोंद्रे यांच्याविरोधात फिर्याद दिली.